Thursday, 13 June 2019

अशासकीय सहाय्यक वसतिगृह अधिक्षक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन


            जळगाव, दि.13 - येथील सैनिकी मुलांचे वसतिगृहात सध्या अशासकीय सहाय्यक अधिक्षक (पुरूष)  एक पद रिक्त आहे. यासाठी जिल्हद्वयातील युद्ध विधवा, विधवा तसेच आजी/माजी सैनिक पत्नी व माजी सैनिक यांनी अशासकीय पदासाठी अर्ज करावेत. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ,जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.                                         
               सैनिकी मुलांचे वसतिगृहात आजी व माजी सैनिकांच्या इयत्ता आठवी पासून पुढील विविध अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेत असलेल्या मुलांना माफक शुल्क आकारून प्रवेश दिल्या जातो. त्यांची भोजन, निवास व अन्य सेवा या बाबींकडे विशेष लक्ष दिले जाते. वसतिगृहात कार्यरत कर्मचारी मुख्यत्वेकरून सैन्य सेवेतून सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी असल्याने त्यांच्याकडून वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम शिस्त लावली जाते व योग्य मार्गदर्शनही करण्याचे काम केले जात आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 0257-2241414 वर संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.
                                                                               000

No comments:

Post a Comment