Saturday, 1 June 2019

सोमवार ३ जून रोजी लोकशाही दिनाचे आयोजन


          जळगाव दि.१:-  प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्ह्याच्या ठिकाणी  लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. तथापि उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडील दिनांक १० मार्च २०१९ रोजीच्या पत्रान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे दिनांक १० मार्च पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली होती. सदर आचार संहितेमुळे जिल्हास्तरावरील दिनांक १ एप्रिल २०१९ व दिनांक ६ मे २०१९ रोजीचे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले नव्हते.
         आचारसंहिता दिनांक २७ मे २०१९ रोजी समाप्त झाल्याने दिनांक ३ जून २०१९ रोजी दुपारी 3.00 वा. लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी  जिल्ह्यातील जनतेने याची नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. 
00000

No comments:

Post a Comment