Saturday, 1 June 2019

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पुर्व प्रशिक्षणामार्फत संधी


          जळगाव दि.१ :- संघ लोकसेवा आयोग (UPSC) नवी दिल्ली यांचेमार्फत कोणत्याही शाखेच्या पदवीधर उमेदवारांसाठी दि.८ सप्टेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या कंम्बाईन्स डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) या संरक्षण दलातील अधिकारी पदाच्या परिक्षेकरीता दिनांक १२ जून २०१९ रोजी एम्प्लॉमेंट न्यूज रोजगार समाचारमध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. संघ लोकसेवा आयोगाकडे ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दिनांक ८ जुलै २०१९ अशी आहे.
            ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी http:/www.upsconline.nic.in या वेब साईटचा वापर करावा कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) या परिक्षेद्वारा कायमस्वरूपी व अल्पमुदतीचे कमीशनसाठी निवड करण्यात येते.
        कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी दिनांक १८ जून २०१९ ते ३१ ऑगस्ट २०१९ या कालावधीत CDS कोर्स क्र ५८ चे आयोजन करण्यात येत आहे. सदर कोर्ससाठी प्रशिक्षणार्थ्यांची निवास,भोजन,आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आलेली आहे.
            तरी जिल्ह्यातील ईच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी साधण्यासाठी  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,जळगाव येथे  १३ जून २०१९ रोजी मुलाखतीस उपस्थित रहावे अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्या दुरध्वनी क्रमांक ०२५३-२४५१०३१, ३२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ,जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
00000

No comments:

Post a Comment