Saturday, 1 June 2019

१०९ व्या अखिल भारतीय व्यवसाय परिक्षेसाठी हॉल तिकीट जनरेट न झालेल्या विद्यार्थ्यांना ३ जूनपर्यंत मुदतवाढ


       जळगाव दि. १ :-  जिल्ह्यातील बी. टी. आर. आय. अंतर्गत नोंदणीकृत आस्थापनांना सूचित करण्यात येते की, शिकाऊ उमेदवारी योजनेतंर्गत १०९ व्या अखिल भारतीय व्यवसाय परिक्षेचे ज्या विद्यार्थ्यांचे अद्याप हॉल तिकिट जनरेट झाले नाहीत अशा विद्यार्थ्याची माहिती Approve करुन सेशनल मार्क ३ जून, २०१९ पर्यंत भरण्यात यावेत जेणेकरुन विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. शिवाय त्यांचे हॉलतिकिट ६ जून, २०१९ नंतर जनरेट होतील व त्यांना नव्याने घेण्यात येण्याऱ्या परिक्षेस बसणे शक्य होईल. असे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था,जळगाव केंद्र, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
000

No comments:

Post a Comment