जळगाव,
दि. 29 :- जिल्ह्यातील कोषागारातंर्गत निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या
सर्व निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी सातव्या वेतन आयोगानुसार
निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना राज्य शासनाच्या आदेशानुसार
निवृत्तीवेतन धारकांच्या जानेवारी 2016 ते डिसेंबर 2018 या कालावधीच्या सातव्या
वेतन आयोगानुसार वाढीव निवृत्तीवेतनाचा पहिला हप्ता प्रदान करण्याचे कामकाज चालु
आहे.
तथापी
संगणक प्रणालीमध्ये वरिष्ठ स्तरावर सुधारणा करत असल्यामुळे माहे जुन-2019 देय
जुलै-2019 चे निवृत्तीवेतन प्रदानास तीन ते चार दिवस विलंब होण्याची शक्यता आहे.
याची नोंद घेण्यात यावी असे आवाहन कोषागार अधिकारी श्री. प्र. सि. पंडीत यांनी एका
प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment