Saturday, 1 June 2019

फैजपूर महसूल उपविभागीय कार्यालयात टंचाई निवारण कक्षाची स्थापना


       जळगाव दि.१ :- जिल्हाधिकारी कार्यालयाप्रमाणेच तालुकास्तरावर तहसिल कार्यालय तसेच उप विभागीय कार्यालयात देखील टंचाई निवारण कक्ष असणे आवश्यक असल्याने फैजपूर उप विभागीय कार्यालयात टंचाई विषयक समस्या व त्यांचे निवारण करणे शिवाय जनतेला टंचाईविषयी  माहिती तात्काळ प्राप्त व्हावी यासाठी टंचाई निवारण कक्षाची स्थापना केली असून त्या कक्षाची अद्यायवत व विनाविलंब माहिती देण्यासाठी या कार्यालयातील अव्वल कारकून श्री. कौशल  चौधरी यांची नियुक्ती करण्यात आहे.
            टंचाई निवारणाविषयी  संपर्कासाठी हेल्पलाईन ९८५०५१०९७५ व ०२५८५-२४६५५५ सुरु करण्यात आलेला आहे. असे उप विभागीय अधिकारी, फैजपूर भाग, फैजपूर  डॉ. अजित थोरबोले  यांनी  एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
00000

No comments:

Post a Comment