Thursday, 13 June 2019

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन


        जळगाव, दि.13 - वीरशैव-लिंगायत समाजासाठी कलात्मक, समाज संघटनात्मक, आध्यात्मिक प्रबोधन व साहित्यीक क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्तींच्या व संस्थांच्या कामाची दखल घ्यावी व इतरांना त्यापासुन प्रेरणा मिळावी. जेणेकरुन या समाजातील समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यीक सरसावुन पुढे यावेत. याकरीता महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार नियमावलीचा शासन निर्णय 8 मार्च, 2019 रोजी निर्गमीत करण्यात आलेला आहे. त्यानुसार  व्यक्तींसाठी एक व सामाजिक संस्थासाठी एक असे एकुण दोन पुरस्कार देण्यात येणार आहे.
            या पुरस्कारासाठी पात्रता बाबतच्या  नियमावलीचा 8 मार्च, 2019 चा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर असुन त्यांचा संकेतांक क्रमांक 201903082039003522 असा आहे.
            जळगाव जिल्ह्यातील इच्छुक संस्था व व्यक्ती यांनी सदरहू पुरस्कारासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ.बाबासहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिरासमोर, जळगाव यांचेकडे आवश्यक कागदपत्रांसह योग्य ती माहिती जोडून सीलबंद लिफाप्यात 15 जुलै, 2019 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत. असे आवाहन योगेश पाटील, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
                                                                             000

No comments:

Post a Comment