Thursday, 13 June 2019

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीमुळे २३ जून रोजी आठवडे बाजार बंद


            जळगाव, दि. १३ - भडगाव तालुक्यातील बोरनार येथील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसह जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूकांसाठी रविवार दिनांक २३ जून २०१९ रोजी मतदान होणार आहे.
            मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तेथील आठवडे बाजार मार्केट ॲण्ड फेअर्स ॲक्ट १८६२ चे कलम ५(अ) व (क) अन्वये जिल्हादंडाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी २३ जून रोजी बंद ठेवून इतर सोयीच्या दिवशी भरविण्यात यावेत.  असे आदेश निर्गमित केले असल्याचे एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
000

No comments:

Post a Comment