Thursday, 20 June 2019

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत ‘वाचन दिन’ उत्साहात साजरा


            जळगाव, दि. 20 - जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्यामार्फत 19 जून, 2019 रोजी कै. गि. न. चांदसरकर प्राथमिक विद्यामंदिर (भगीरथ विद्यालय, जळगाव) येथे ‘वाचन दिन’ (Reading Day) साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी पुस्तक वाचनाचे आयोजन करण्यात आले होते.
            या कार्यक्रमाचे उदघाटन कै. गि. न. चांदसरकर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शाम ठाकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे हे उपस्थित होते.
            केरळ राज्यात राज्य शासनामार्फत सन 1996 पासून 19 जून हा दिवस ‘वाचन दिन’ (Reading Day) हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच पी. एन. पनिकर यांच्या स्मरणार्थ पनिकर फांउडेशनमार्फत जुन महिन्यात एक आठवडा वाचन आठवडा (Reading Week) म्हणून साजरा केला जातो. त्याचधर्तीवर ‘Reading Mission 2022’ या उपक्रमाच्या अनुषंगाने लोकांना वाचनाची सवय व्हावी, या उद्देशाने प्रधानमंत्री यांनी 2022 पर्यंत 30 कोटी लोकांपर्यंत हा उपक्रम राबविण्याचे लक्ष ठेवले आहे.
            या उपक्रमातंर्गत इयत्ता दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांना जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जळगाव मार्फत गोष्टी,  चरीत्र, निबंध, नाटक व कविता विषयक पुस्तके वर्गामध्ये वाचण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली. या उपक्रमाचा सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद यांनी लाभ घेतला.
            या प्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे, सहकारी रामदास शिंदे, सुनिल जगताप, किरण चौधरी, संजय ठाकूर, केदारनाथ सोनार यांच्या समवेत कै. गि. न. चांदसरकर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शाम ठाकरे, उपशिक्षक स्वप्निल भोकरे, जयश्री पाटील व शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.
000

No comments:

Post a Comment