Thursday, 13 June 2019

शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी उमेदवारांना एक महिना अगोदर ऑनलाईन अर्ज करता येणार


            जळगाव,  दि. 13 - उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव कार्यक्षेत्रात तालुकानिहाय मासिक दौरा घेण्यात येत आहे. अशी माहिती श्याम लोही, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे.
            प्रत्येक तालुक्यात तालुक्यात स्लॉट अपॉईमेंट ही मासिक दौऱ्याच्या चार दिवस आधी प्रदर्शित करण्यात येत होती. परंतु शिकाऊ अनुज्ञप्ती काढणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सदरची अपॉईटमेंट आता माहे जुलै व त्या पुढील महिन्यांसाठी एक महिना अगोदर प्रसिद्ध करण्यात येणार असल्यामुळे उमेदवारांची होणारी गैरसोय दूर होणार आहे. यापुढे शिकाऊ अनुज्ञप्तीसाठीची ऑनलाईन अपॉईंटमेंट ही प्रत्येक महिन्याच्या 25 तारखेला प्रदर्शित करण्यात येणार आहे. याची नोंद सर्व अनुज्ञप्ती धारक, मोटार ड्रायव्हिंग स्कुल संचालक यांनी घ्यावी. असे श्री. लोही, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
000

No comments:

Post a Comment