Tuesday, 12 March 2019

आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी ओळखपत्राचे 11 पुरावे ग्राह्य धरणार - जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. ढाकणे



जळगाव, दि. 12 (जिमाका) :- आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करीता मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC) सादर करु शकणार नाहीत, अशा मतदारांना त्यांची स्वतंत्र ओळख पटविण्यासाठी छायाचित्र मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त पुढीलप्रमाणे अकरा पैक एक कागदपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत आयोगाने आदेश दिले आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.  
यामध्ये पारपत्र (Passport), वाहन चालक परवाना, केंद्र/राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम/ सार्वजनिक मर्यादित कंपनीचे स्वत:चे छायाचित्र असलेले नोकरी ओळखपत्र, बँक/टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरीत करण्यात आलेले पासबुक, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांचेद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, मनरेगाअंतर्गत निर्गमित जॉब कार्ड, भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाच्या योजनेंतर्गत निर्गमित हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन कागदपत्र, मा. खासदार, मा. आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र, आधारकार्ड यांचा समावेश असेल.
            तसेच प्रवासी भारतीय (N.R.I.) मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा केवळ मूळ पासपोर्ट आवश्यक राहील याची नोंद सर्व मतदारांनी घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. ढाकणे  यांनी केले आहे.
000

No comments:

Post a Comment