जळगाव, दि. 19 - केंद्र शासनाने त्यांचेकडील
अधिसूचना क्रमांक एसओ-564 (ई) दिनांक 31 जानेवारी, 2019 अन्वये बेकायदेशीर कृत्ये
(प्रतिबंध) अधिनियम 1967 अतंर्गत स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी)
या संघटनेवर बंदी घातलेली आहे. तसे उप सचिव, गृह मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली
यांच्या पत्रान्वये कळविण्यात आले आहे.
अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी वामन कदम यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे. ० ० ०
No comments:
Post a Comment