Thursday, 7 March 2019

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन


            जळगाव, दि. 7 - राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 8 मार्च, 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात सकाळी 8.45 वाजता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी दिली आहे.
            या बैठकीत मागील बैठकीचे इतिवृत्तास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना 2018-2019 माहे फेब्रुवारी अखेर झालेल्या खर्चाचा आढावा घेणे (सर्व साधारण, अनुसुचित जाती उपयोजना, आदिवासी घटक कार्यक्रम), जिल्हा वार्षिक योजना 2018-2019 पुनर्विनियोजन प्रस्तावास कार्योत्तर मंजूरी देणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2019-2020 प्रारुप आराखड्यास कार्योत्तर मंजूरी देणे, आदर्श आमदार ग्राम योजनेचा आराखडा मंजुर करणे, स्थानिक स्वराज्य संस्था (जिल्हा  परिषद/महानगरपालिका/नगरपालिका) कडील अखर्चीत निधीचा आढावा घेणे, मा. अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या आयत्या वेळेच्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.      
                                                                    000

No comments:

Post a Comment