चाळीसगाव
दि. 29 - लोकसभा निवडणूकीवर लक्ष ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या भरारी व निगराणी
पथकांबरोबरच इतर पथकांनी उमेदवारांच्या प्रचार सभा व रॅलीवर लक्ष ठेवावे, असे निर्देश
03 जळगाव लोकसभा मतदार संघाचे निवडणूक खर्च निरिक्षक वेणूधर गोडेशी यांनी दिले.
श्री. गोडेशी
यांनी आज चाळीसगाव येथील तहसिल कार्यालयात विविध पथक प्रमुखांचा निवडणूक खर्चाचा
आढावा घेतला. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय
अधिकारी शरद पवार, तहसिलदार अमोल मोरे, तुषार चिनावलकर उपस्थित होते.
यावेळी
बोलतांना श्री. गोडेशी म्हणाले की, पथकांनी उमेदवारांच्या प्रचार सभा, रॅली, राजकिय
पक्षांचे झेंडे, पोस्टर, बॅनर्स, प्रचाराची वाहने यावर बारकाईने लक्ष ठेवावे.
प्रचार सभेतील वाहने, खुर्च्या यासह इतर साहित्यांचे शुटींग करावे. मोठया रॅलीची
शुटींग करण्यासाठी आवश्यकता असल्यास मोबाईलचा वापर करावा. उमेदवारांनी निवडणूक
खर्च सादर करतांना निवडणूक शाखेने ठरविलेल्या दरपत्रकाप्रमाणे खर्च दाखविण्यात आला
आहे का याची खातरजमा करावी. विविध पथकांनी
आपला वस्तुस्थितीदर्शक अहवाल निवडणूक विभागास सादर करावा. असे निर्देशही त्यांनी
यावेळी दिले.
यावेळी
त्यांनी मेहुणबारे येथील पथकाने खर्च निरिक्षकांचेही वाहन तपासल्याबद्दल पथकाच्या
कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
000
No comments:
Post a Comment