Wednesday, 20 March 2019

प्रचार साहित्यात सुरक्षा दलातील व्यक्तींचे छायाचित्र वापरावर निर्बंध



            जळगाव, दि. 20 - लोकसभा निवडणूकीत उमेवारांनी/राजकीय पक्षांनी जाहिराती करतांना सुरक्षा दलातील व्यक्तींच्या छायाचित्रांचा वापर करण्यावर निर्बंध घातले आहे.
            याबाबत भारत निवडणूक आयोगाच्या प्रधान सचिवांनी 19 मार्च, 2019 रोजी उमेदवारांनी/राजकीय पक्षांनी जाहिराती  करतांना सुरक्षा दलातील व्यक्तींच्या छायाचित्रांचा वापर करण्यापासून परावृत्त होण्याबाबत समुपदेशन जारी केले आहे. असे सहाय्यक आचारसंहिता कक्ष प्रमुख तथा नायब तहसिलदार, (गृह शाखा) जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव श्री. रविंद्र मोरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००

No comments:

Post a Comment