Wednesday, 6 March 2019

निवडणूकीचे कामकाज जबाबदारी पूर्वक पार पाडावे - जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे




            जळगाव, दि. 6, -  भारतासारख्या लोकशाही प्रधान देशात देशाच्या सर्वोचे सभागृह लोकसभेच्या  नजिकच्या काळात होणाऱ्या निवडणूकीसाठी  आदेशित केलेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी  भारत सरकार निवडणूक आयोगाने वेळो-वेळी दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करून निवडणूकीसाठी नेमणूक झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी निवडणूकीचे काम राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जबाबदारीपुर्वक पार पाडावे अशे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी  नियोजन भवन येथे आयोजित निवडणूक प्रशिक्षण वर्गास उपस्थित अधिकारी कर्मचारी वर्गास  संबोधन करताना केले.
            याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे,  निवासी उप जिल्हाधिकारी वामन कदम, तहसिलदार शरद मंडलीक, जळगाव  लोकसभा तसेच रावेर लोकसभा मतदार संघासाठी नियुक्त अधिकारी -कर्मचारी ,जिल्हाधिकारी  कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते.
           जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे पुढे म्हणाले की,लोकसभा निवडणूक 2019 या निवडणूकीत अत्याधुनिक यंत्रामग्रीचा वापर करावयाचा असल्याने संबंधितांनी निवडणूकीतील यंत्रणेच्या नेहमी संपर्कात राहून तसेच आप-आपसात समन्वय ठेवून काम केल्यास अडचण येणार नाही. निवडणूकीत नियुक्त अधिकारी-कर्मचारी निवडणूक कामी नियुक्त झाल्यापासून  सर्वस्वी निवडणूक आयोगाच्या अखत्यारित काम करत असल्याने निवडणूक कामात 100 टक्के बिनचुक काम म्हणजे अगदी कळत-नकळत झालेल्या लहानतल्या लहान चुकीलाही माफी नसते  आणि म्हणून प्रत्येकाने विचारपूर्वक ,शांतपणे आणि निवडणूक यंत्रणेतील गाव पातळी वरील तलाठी ,ग्रामसेवकच नव्हे तर अगदी कोतवालांशी सुध्दा संपर्क ठेवावा म्हणजे त्यांच्या कडून निवडणूक केंद्रांची भौगोलिक तसेच स्थानिक परिस्थतीची योग्य माहिती वेळेवर उपलब्ध  होण्यास मदत होईल.

            प्रारंभी अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर ,निवडणूक उप जिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे ,निवासी उप जिल्हाधिकारी वामन कदम, यांनी  आप-आपल्या  मार्गदर्शनात लोकसभा निवडणूक 2019 साठी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक पध्दतीने होणाऱ्या आगामी निवडणूकीत नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वाढलेल्या जबाबदाऱ्यांबाबत सांगतांना निवडणूककामी वापरण्यात येणाऱ्या यंत्र सामुग्रीच्या वापरा विषयी  मुद्देसुद आणि  शंकांचे निरसनास माहिती करून दिली. तसेच उपस्थित तज्ञांकडून निवडणूक यंत्रांचे प्रात्याक्षिक दाखविले.
000000

No comments:

Post a Comment