जळगाव, दि. 29 - लोकसभा निवडणूकीसाठी अर्ज सादर करण्याच्या दुसऱ्या दिवशी 03-जळगाव लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाकडून आमदार स्मिता उदय वाघ यांनी दोन उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचेकडे दाखल केले.
तर 04-रावेर लोकसभा मतदार संघासाठी आज एकही अर्ज प्राप्त झाला नसल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी तथा रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
000
No comments:
Post a Comment