जळगाव, दि. 30 - लोकसभा निवडणूकीसाठी अर्ज सादर करण्याच्या तिसऱ्या दिवशी (30 मार्च) 03-जळगाव लोकसभा मतदार संघात राष्ट्रीय समाजवादी पक्ष (सेक्युलर) कडून मोहन शंकर बिऱ्हाडे यांनी एक उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा जळगाव लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचेकडे दाखल केला.
तर 04-रावेर लोकसभा मतदार संघासाठी आज एकही अर्ज प्राप्त झाला नसल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी तथा रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
000
No comments:
Post a Comment