जळगाव,
दि. 23 - निवडणूकीचे वार्तांकन करतांना माध्यम प्रतिनिधी व विश्लेषकांना मागील
निवडणूकीचे संदर्भ उपलब्ध व्हावेत. याकरीता जळगाव जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या ‘लोकसभा निवडणूक
पूर्वपीठीका-2019’ चे प्रकाशन नाशिक विभागाचे विभागीय महसुल आयुक्त राजाराम माने
यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.
अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अपर जिल्हाधिकारी तथा रावेर
लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी
गोरक्ष गाडीलकर, सहाय्यक आयुक्त (प्रशासन) उन्मेष महाजन, जिल्हा परिषदेचे
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम,
उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके
यांचेसह जिल्ह्यातील सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.
या
पूर्वपिठीकेत जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघातील सन 1952 ते 2014 या कालावधीतील
विजयी उमेदवार, मतदार संघाचे नकाशे, निवडणूक प्रक्रियेतील महत्वाचे अधिकारी यांचे
संपर्क क्रमांक, मागील निवडणूकीतील उमेदवारांना विधानसभा मतदार संघनिहाय मिळालेली
मते, सन 2019 च्या लोकसभा निवडणूकीसाठी जिल्ह्यातील पुरुष, स्त्री मतदारांची व
मतदान केंद्रांची संख्या, निवडणूकीचा सविस्तर कार्यक्रम आदि विविध स्वरुपाची
माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही माहिती निवडणूक विश्लेषक व माध्यम
प्रतिनिधींना निश्चितच उपयुक्त ठरणार असल्याचे मत विभागीय आयुक्त राजाराम माने
यांनी प्रकाशनाप्रसंगी व्यक्त केले.
या
पूर्वपीठीकेची संकल्पना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची असून यासाठी उपजिल्हा
निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळेंसह निवडणूक शाखेतील अधिकारी, कर्मचारी यांचे
सहकार्य लाभले. ही पूर्वपीठीका निवडणूक विश्लेषकांसाठी जिल्हा माहिती कार्यालय,
जळगाव येथे उपलब्ध होईल. अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी
दिली.
000
No comments:
Post a Comment