जळगाव, दिनांक 2 - राज्य कृषि मुल्य आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ना. पाशा पटेल हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
शनिवार, दिनांक 2 मार्च, 2019 रोजी दुपारी 4.00 वाजता लातूर येथून जळगावकडे प्रयाण. रात्री 10.00 वाजता शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व मुक्काम.
रविवार, दिनांक 3 मार्च, 2019 रोजी सकाळी 9.00 वाजता जळगाव येथून रावेर, जळगावकडे प्रयाण. सकाळी 11.00 वाजता माजी सैनिक बहुउद्देशिय सभागृह, रावेर येथे कृषिसेवक राज्यस्तरीय पुरस्कार सन्मान सोहळा कार्यक्रमास उपस्थित व सोईनुसार नाशिककडे प्रयाण व मुक्काम.
000
No comments:
Post a Comment