Tuesday, 12 March 2019

जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा संपन्न



            जळगाव, दि. 12 (जिमाका) :- जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा प्रशासन, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा परिषदेचा महिला व बाल विकास विभाग, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा नियोजन भवनात महिला मेळावा व बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले.
            या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधिश श्री ठोंबरे हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, महिला व बालविकास अधिकारी ( जि.प) रफीक तडवी, बाल कल्याण समिती अध्यक्ष वैजयंती तळेले, जिल्हा सल्लागार समितीच्या सदस्य निवेदीता ताठे व सना जहागीर खान, अँड. ज्योती भोळे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या सुरभी दर्प, श्रृती जगताप, सई जोशी, अंजली पाटील, कांचन चौधरी, शिवानी देशमुख, जयश्री चौधरी या महिला खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
            यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. ठोंबरे यांनी महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन केले, तसेच ॲड ज्योती भोळे यांनी महिला सक्षमीकरणाबाबत उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश काटकर यांनी केले. सूत्रसंचलन परीवीक्षा अधिकारी यांनी तर आभार प्रदर्शन विधी सल्लागार यांनी केले. कार्यक्रमास महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
०००

No comments:

Post a Comment