जळगाव,
दि. 12 - लोकसभा निवडणूकीच्या विविध कामांच्या समन्वयासाठी नोडल अधिकाऱ्यांची
नियुक्त करण्यात आली आहे. या नोडल अधिकाऱ्यांनी त्यांचेवर सोपविण्यात आलेल्या
कामकाजाबाबत करावयाच्या कामाचे परिपूर्ण नियोजन करुन कामास लागावे. असे प्रतिपादन
अपर जिल्हाधिकारी तथा 04-रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गोरक्ष
गाडीलकर यांनी केले.
लोकसभा
निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिकारी यांनी निवडणूकीच्या अनुषंगाने
आतापर्यंत केलेल्या कार्यवाही व करावयाच्या कामाच्या नियोजनाची आढावा बैठक
जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. गाडीलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या
बैठकीस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, निवासी
उपजिल्हाधिकारी वामन कदम, निवडणूक उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, महसुल
उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, उपविभागीय पोलीस अधिकारी (मुख्यालय) केशव पातोंड,
जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी प्रमोद बोरोले,
जिल्हा कोषागार अधिकारी प्र. सि. पंडित, माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन,
निवडणूक तहसीलदार सुरेश थोरात, मंदार कुलकर्णी, राहूल जाधव यांच्यासह नोडल अधिकारी
व निवडणूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी
बोलतांना श्री. गाडीलकर म्हणाले की, पोलीस विभागाने लोकसभा निवडणूकीसाठी
बंदोबस्ताचा प्राथमिक आराखडा तयार करावा. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा दैनंदिन अहवाल
पाठवावा. शस्त्र जमा करणे तसेच हद्दपारीचे काही प्रस्ताव असल्यास ते तातडीने
उपविभागीय अधिकारी यांचेकडे सादर करावेत. क्रिटीकल व संवेदनशील मतदान केंद्रांची
माहिती घेण्याच्या सुचना दिल्यात. तसेच निवडणूक निरिक्षकांसाठी आवश्यक बाबींच्या
सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. निवडणूक निरिक्षकांना देण्यासाठी व मतदानाचा
टक्केवारी वाढण्यासाठी मतदार जनजागृतीबाबत करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती
तयार करणे. आचारसंहिता कक्षाने प्रिंटर्स व बॅकर्सची बैठक घेणे, निवडणूक काळात
उमेदवारांचा कोणत्या बाबींवर अधिक खर्च होतो याची माहिती कोषागार विभागाने काढून
ठेवावी. त्याचप्रमाणे मतपत्रिका छपाई, टपाली मतदान, निवडणूक साहित्य, निवडणूकसाठी
नेमण्यात आलेले मनुष्यबळ, कर्मचाऱी प्रशिक्षण घेणे, प्रचारसाहित्याचे दर राजकीय
पक्षांना कळविणे आदि बाबींचा आढावा घेतला. तसेच सर्व संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी
त्यांचेवर सोपविण्यात आलेली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याच्या सूचनाही श्री.
गाडीलकर यांनी सर्वांना दिल्यात.
000
No comments:
Post a Comment