Tuesday, 26 March 2019

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी 6 एप्रिल रोजी होणार परीक्षा


            जळगाव, दि.26 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, नवी दिल्ली यांच्यातर्फे सहावीच्या प्रवेशासाठी होणारी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा – 2019 जळगाव जिल्ह्यातील 29 परीक्षा केंद्रांवर शनिवार 6 एप्रिल 2019 रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 या कालावधीत होईल. 
  या परीक्षेसाठी पात्र विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी पाल्याचे प्रवेशपत्र https://www/nvsadmissiondassix.in/nvs६reg/homepage या लिंकवरुन डाऊनलोड करुन घ्यावे. गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांनी विद्यार्थी व पालकांना प्रवेश पत्र डाउनलोड करुन घेण्याच्या सूचना द्याव्यात.
           प्रवेश पत्र डाउनलोड करण्यात काही अडचण आल्यास जवाहर नवोदय विद्यालय, भुसावळ येथे कार्यालयीन वेळेत संपर्क करावा.
            अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक 8329980315, 9404900916 वर संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. आर. आर. खंडारे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
                                                                     00000

No comments:

Post a Comment