जळगाव,
दि.7 - संकटग्रस्त व पिडीत महिलांसाठी जिल्ह्यात एकाच छताखाली आरोग्यासेपर, कायदे
विषयक मार्गदर्शन, मानसशास्त्रीय समुपदेशन, तात्पुरता निवारा, हेल्पलाईन नंबर आदि
सुविधा मिळवून देण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात वन स्टॉप सेंटर ही केंद्र पुरस्कृत
योजना सुरु करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश
काटकर यांनी दिली आहे.
या
केंद्रासाठी कायमस्वरूपी जागा मिळेपर्यंत हे केंद्र तात्पुरत्या स्वरूपात शासकीय
आशादिप महिला वसतीगृह, प्लॉट नं. 6, विजय कॉलनी, गणेश कॉलनी जवळ, अशोक बेकरी समोर,
जळगाव येथे सुरू करण्यात आले आहे.
तरी
जिल्ह्यातील पिडीत व संकटग्रस्त महिलांनी या सेंटरचा व योजनेचा लाभ घ्यावा. असे
आवाहन जिल्हा महिला महिला व बाल विकास अधिकारी रमेश बा. काटकर यांनी एका प्रसिद्धी
पत्रकान्वये केले आहे.
000
No comments:
Post a Comment