जळगाव, दि. 7 - तापी पाटबंधारे विकास
महामंडळाच्यावतीने मोर नदीवरील अंजाळे व पिळोदा येथील पुलाचा ई-भुमीपूजन समारंभ
राज्याचे महसूलमंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील
यांच्या हस्ते येथील जिल्हा नियोजन भवनात शुक्रवार, दिनांक 8 मार्च 2019 रोजी सकळी
10.00 वाजता होणार आहे.
कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. गिरीष महाजन, विशेष
अतिथी म्हणून राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या
अध्यक्षा श्रीमती उज्वलाताई पाटील, प्रमुख अतिथी म्हणून जळगावचे खासदार श्री. ए. टी.
नाना पाटील, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, विधान परिषद सदस्य श्री. सुधीर तांबे,
श्रीमती स्मिताताई वाघ, श्री.चंदूलाल पटेल, श्री.किशोर दराडे, विधानसभा सदस्य श्री.संजय
सावकारे, श्री. हरिभाऊ जावळे यांच्या विशेष उपस्थितीत होणार आहे. अशी माहिती इंजिनिअर
आ. श्री. मोरे, अधिक्षक अभियंता, जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ, जळगाव यांनी एका
प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
000
No comments:
Post a Comment