जळगाव, दि. 7- राज्यातील हातमाग
विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी विणकरांनी उत्पादीत केलेल्या उत्कृष्ट वाणाला
सन्मान मिळावा. या दृष्टीकोनातून मुंबई विभागात विभागीय हातमाग कापड स्पर्धेचे
आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती
प्रादेशिक उपसंचालक, वस्त्रोद्योग, मुंबई सुरेंद्र तांबे यांनी दिली आहे.
विभागीय हातमाग कापड स्पर्धांचे आयोजन
हे प्रादेशिक उपसंचालक वस्त्रोद्योग, मुंबई, 7 वा मजला, चरई टेलिफोन एक्स्चेंज
बिल्डींग, मावळी मंडळ रोड, ठाणे पश्चिम यांचेमार्फत दिनांक 15 मार्च, 19 रोजी
सकाळी 12.30 वाजता आयोजित करण्यात आले आहे. विभागीय हातमाग कापड स्पर्धेत प्रथम, द्वितीय
व तृतीय वक्षीस पात्र नमुन्याकरिता अनुक्रमे 25 हजार, 20 हजार, व 15 हजार रुपयांचे
बक्षीस देण्यात येणार आहे. हातमाग कापडाचे नमुने मुंबई येथील कार्यालयात
वस्त्रनिर्माण निरीक्षण यांना 14 मार्च, 2019 रोजी दुपारी 4.00 वाजेपर्यंत सादर
करावे. नमुन्यांवर संपुर्ण नांव व पत्ता व वापरण्यात आलेल्या धाग्याचा प्रकार तसेच
कापडाचे विवरण किंमतीसह देणे आवश्यक आहे.
स्पर्धेत भाग घेणाऱ्या विणकरांनी
कमीत-कमी 1 नग व मिटरमध्ये कमीत-कमी 2 मिटर कापड स्पर्धेकरीता पाठवून या स्पर्धेचा
लाभ घ्यावा. असे आवाहन प्रादेशिक उपसंचालक वस्त्रोद्योग ,मुंबई यांनी एका
प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
000
No comments:
Post a Comment