Friday, 22 March 2019

कौटुंबीक हिंसाचारापासून महिलांच्या संरक्षणाबाबत कार्यशाळा संपन्न


      जळगाव, दि. 22 - कौटुंबीक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 अंतर्गत जिल्ह्यातील संरक्षण अधिकारी व स्टेक होल्डर्स यांच्या कार्यवाहीचा आढावा घेण्याकरीता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्यावतीने आढावा बैठक व एक दिवसीय कार्यशाळा नुकतीच लुंकड सभागृह (रोटरी हॉल) गणपती नगर, जळगाव येथे संपन्न झाली.
       या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधिश श्री. ठोंबरे हे उपस्थित होते. तर प्रमुख वक्ते म्हणून सरकारी वकील ॲड अनुराधा वाणी व ॲङ ज्योती भोळे ह्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधिश श्री. ठोंबरे यांनी कौटूंबीक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 अंतर्गत सरकारी प्रक्रीया व त्यात स्टेक होल्डर्स यांची भूमीका याबाबत महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन केले.
       या कार्यक्रमास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी  कार्यालयाच्या जिल्हा व तालुका स्तरावर कार्यरत असलेले संरक्षण अधिकारी, विधी सल्लागार, जिल्ह्यातील समुपदेशन केंद्रातील समुपदेशक, पोलीस अधिक्षक कार्यालयातील व तालुका स्तरावरील पोलीस अधिकारी, जिल्हा शासकीय रुग्णालयातील व तालुका स्तरावरील शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, जिल्हा व तालुका स्तरावरील विधी सेवा प्राधिकरणमार्फत पॅनलवर असलेले वकील यांच्यास जिल्ह्यातील घोषीत करण्यात आलेल्या आश्रयगृहांचे अधिक्षक उपस्थित होते.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश काटकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संरक्षण अधिकारी यांनी तर आभार प्रदर्शन विधी सल्लागार संध्या वानखेडे यांनी केले.
०००

No comments:

Post a Comment