Friday, 8 March 2019

जिल्ह्यात 18 मार्च रोजी डाक अदालतीचे आयोजन



        जळगाव, दि. 8- पोस्टाच्या कामांसंबंधीच्या ज्या तक्रारींचे निराकरण सहा आठवड्यांच्या आत झालेले नाही. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी अधिक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव येथे 18 मार्च, 2019 रोजी दुपारी चार वाजता डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती अधिक्षक डाकघर, जळगाव यांनी दिली आहे.
            नागरिकांनी आपल्या तक्रारी संपूर्ण माहितीसह दोन प्रतित अधिक्षक डाकघर कार्यालय, पहिला मजला, हेड पोस्ट ऑफिस बिल्डींग, जळगाव 425001 या पत्त्यावर 11 मार्च, 2019 पूर्वी पोहोचेल अशा बेताने पाठवाव्यात. मुदतीनंतर आलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही. असे अधिक्षक डाकघर, जळगाव यांनी कळविले आहे.
०००

No comments:

Post a Comment