Friday, 15 March 2019

मुंबई येथे 27 मार्च रोजी डाक अदालतचे आयोजन


  जळगाव, दि. 15 - पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवडयांच्या आत निराकरण झाले नसेल. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी  चीफ पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांचे कार्यालय, मुंबई जी.पी.ओ. बिल्डिंग, दुसरा माळा, मुंबई 400001 येथे दि. 27 मार्च 2019  रोजी अकरा वाजता  डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.  
  या अदालतीत टपाल वस्तु, मनी ऑर्डर, बचत बॅंक खाते, प्रमाणपत्र या संदर्भातील तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह करावा. डाकसेवेबाबतची तक्रार दोन प्रतीत आर. एन. चेटुले, सहाय्यक निदेशक डाकसेवा (ज.शि) तथा सचिव डाक अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जी.पी.ओ. बिल्डिंग, दुसरामाळा, मुंबई 400001 यांच्या नावे  दि. 15 मार्च,2019 पर्यंत पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहितीसाठी  www.maharashtrapost.gov.in  या संकेतस्थळास भेट द्यावी. असे आवाहन मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल  यांनी केले आहे.
                                                                       ०००

No comments:

Post a Comment