जळगाव, दि. 30 - शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी.ए) परिक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम) परिक्षा 23 ते 25 मे, 2019 दरम्यान होणार आहे. या परिक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास 8 एप्रिल, 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव श्री. मेघराज राठोड यांनी दिली आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याबाबत सविस्तर सूचना/माहिती सहकार खात्याच्या www.mahasahakar.maharashtra.bov.in व www.sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी परिक्षांर्थ्यांनी परिक्षेसंदर्भात संबंधित संकेतस्थळाचा लाभ घेवून परिक्षेसाठी विहित मुदतीत अर्ज करावेत. असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकार संस्था, जळगाव श्री. राठोड यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००
No comments:
Post a Comment