Thursday, 28 March 2019

जळगाव लोकसभा मतदार संघात दोन तर रावेर लोकसभा मतदार संघात एक उमेदवारी अर्ज दाखल


             
       

जळगाव, दि. 28 -लोकसभा निवडणूकीसाठी अर्ज सादर करण्याच्या पहिल्या दिवशी 03-जळगाव लोकसभा मतदार संघात दोन तर 04-रावेर लोकसभा मतदार संघासाठी एक उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
       03-जळगाव लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीकडून गुलाबराव देवकर यांनी दोन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचेकडे दाखल केले. तर 04-रावेर लोकसभा मतदार संघासाठी भारतीय जनता पक्षाकडून श्रीमती रक्षाताई खडसे यांनी एक उमेदवारी अर्ज अपर जिल्हाधिकारी तथा रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचेकडे दाखल केला.
000

No comments:

Post a Comment