Monday, 18 March 2019

24 मार्च रोजी भरणारे आठवडे बाजार इतर दिवशी भरविण्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ. ढाकणे यांचे आदेश


जळगाव, दि. 17 - जिल्ह्यातील जामनेर, अमळनेर, यावल, चाळीसगाव तालुक्यातील 14  ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक तसेच चाळीसगाव तालुक्यातील ओझर ग्रामपंचायत येथे थेट सरपंच पदासाठी पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार 24 मार्च, 2019 रोजी मतदान होणार आहे. 
  त्याचप्रमाणे शुक्रवार, 22 मार्च, 2019 रोजी भडगाव शहरात संत तुकाराम यांची बीजची मिरवणुक निघणार आहे.  या कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, याकरीता 24 मार्च, 2019 या दिवशीचे जामनेर तालुक्यातील वाक्री खु., जंगीपुरा, अमळनेर तालुक्यातील हिंगोणे बु., मालपुर, खडक, लोणसिम, लोण बु. तळवाडे, निसर्डी, दहिवद खु., कुऱ्हे खु, यावल तालुक्यातील पिलादे बु., आणि चाळीसगाव तालुक्यातील ओझर या गावांचे आठवडे बाजार तसेच दिनांक 22 मार्च, 2019 रोजी भडगाव शहरातील आठवडे बाजार इतर सोईच्या दिवशी भरविण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहे.
                                                                       000

No comments:

Post a Comment