Thursday, 28 March 2019

निवडणूकीशी संबंधित सर्व पथकांनी आपले काम चोखपणे पार पाडावे - खर्च निरिक्षक वेणूधर गोडेशी


                




        जळगाव, दि. 28 - लोकसभा निवडणूकीवर लक्ष ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या भरारी व निगराणी पथकांबरोबरच इतरही पथकांनी उमेदवारांच्या प्रचार खर्चावर बारकाईने लक्ष ठेवून त्याची नोंद खर्च नोंदवहीत आल्याची खात्री करण्याचे निर्देश जळगाव लोकसभा मतदार संघाचे खर्च निरिक्षक वेणूधर गोडेशी यांनी दिले.
       श्री. गोडेशी यांनी आज येथील जिल्हा नियोजन भवनात जिल्ह्यातील विविध पथकातील अधिकाऱ्यांकडून लोकसभा मतदार संघनिहाय निवडणूकीच्या खर्चाचा आढावा घेतला. यावेळी रावेर लोकसभा मतदार संघाचे खर्च निरिक्षक मधुकर आनंद, जिल्हा कोषागार अधिकारी प्रवीण पंडित, तुषार चिनावलकर, श्री. बेहरे आदि उपस्थित होते.
      यावेळी बोलतांना श्री. गोडेशी म्हणाले की, उमेदवार व राजकिय पक्षांचे झेंडे, पोस्टर, बॅनर्स, प्रचार वाहने आदि बाबींवर बारकाईने लक्ष ठेवावे. प्रचार सभा, रॅलीचे संपूर्ण चित्रीकरण करतांना काळजीपूर्वक व निपक्ष:पातीपणे करुन त्याचा दैनंदिन अहवाल सादर करावा. उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर करतांना निवडणूक शाखेने ठरविलेल्या दरपत्रकाप्रमाणे खर्च दाखविण्यात आला आहे का याची खातरजमा करावी. जे अधिकारी आपला अहवाल वस्तुस्थितीदर्शक सादर करणार नाही त्यांचा अहवाल आयोगाला सादर करण्यात येणार असल्याचेही श्री. गोडेशी यांनी यावेळी सांगितले.
निवडणूक खर्च निरिक्षकांची माध्यम कक्षास भेट
     जळगाव लोकसभा मतदार संघाचे खर्च निरिक्षक वेणूधर गोडेशी यांनी आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील मिडीया कक्षास भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, तुषार चिनावलकर होते.
     यावेळी जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके यांनी श्री. गोडेशी यांना मिडीया कक्षातील कामकाजाची माहिती दिली.
      याप्रसंगी श्री. गोडेशी यांनी निवडणूक कालावधीतील वर्तमानपत्रातील जाहिराती, पेडन्यूज, सोशल मिडीया, आकाशवाणी, एफएम, इलेक्ट्रॉनिक्स मिडीयावरील जाहिरात व इतर बाबींवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना सर्व संबंधितांना दिल्यात. तसेच पेडन्यूज आढळून आल्यास तात्काळ त्याची माहिती निवडणूक खर्च शाखेस देण्याचेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

      निवडणूकीच्या कालावधीत आपल्यावर सोपविलेली जबाबदारीप्रत्येकाने प्रामाणिकपणे पार पाडावी.उमेदवारांचे प्रचारसाहित्य, सभांसाठी आलेले नेतेगण यांचा खर्च उमेदवाराच्या खर्चात दाखविण्यात आला आहे की नाही याची खात्री करावी. विविध पथकांनी आपला आजचा अहवाल दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत निवडणूक खर्च शाखेकडे सादर करण्याचे निर्देश रावेर लोकसभा मतदार संघाचे खर्च निरिक्षक मधुकर आनंद यांनी दिले.
000

No comments:

Post a Comment