जळगाव, दि. 28 - आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास,
रोजगार व उद्योजकता माहिती मार्गदर्शन केंद्र, रावेर, जि. जळगाव मार्फत अनुसूचीत
जमातीतील उमेदवारांना स्पर्धा परिक्षेकरीता 1 एप्रिल, 2019 ते 15 जुलै, 2019 असे
एकूण 3 महिने 15 दिवसांचे प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे.
प्रवेश मिळविण्याकरीता www.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावर
नांव नोंदणी करणे आवश्यक असून प्रवेशासाठी उमेदवार हा अनुसूचीत जमातीचा असावा.
(जातीचा दाखला आवश्यक)उमेदवार हा शालांत परीक्षा (दहावी) उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे
वय18 वर्ष पुर्ण असावे. प्रवेशासाठी अंतीम दिनांक 28 एप्रिल, 2019 आहे. या
प्रशिक्षणामध्ये भाग घेणा-या आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांची विविध
शासकीय/निमशासकीय निवड समित्यांमार्फत घेतल्या जाणा-या स्पर्धा परिक्षांची तयारी
करुन घेतली जाते. प्रशिक्षण काळात प्रशिक्षणार्थी उमेदवारांना दरमहा रुपये एक हजार
विद्यावेतन देण्यात येते.
अधिक माहितीसाठी आदिवासी
उमेदवारांकरीता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र,
प्लॉट नं.2, शनी मंदिरामागे, स्टेशन रोड, पंचायत समिती जवळ, रावेर किंवा
संपर्कासाठी दुरध्वनी क्र. 02584-251906
या क्रमांकावर संपर्क साधावा,
प्रशिक्षणाच्या कालावधीत उमेदवारांना
राहण्याची व भोजनाची व्यवस्था स्वत:करावी लागेल. असे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन
अधिकारी, रावेर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment