जळगाव, दि. 12 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्याचे पहिले
मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी
कार्यालयात अभिवादन करण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी स्व.
यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपजिल्हाधिकारी (महसुल) रविंद्र
भारदे, तहसीलदार (महसुल) मंदार कुलकर्णी यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी व
कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment