Friday, 8 March 2019

13 मार्च रोजी महिला उमेदवारांसाठी पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा



 जळगाव, 8:- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्दोजकता मार्गदर्शन केंद्र पहिला मजला डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्केट,जिल्हा पेठ जळगाव येथे 13 मार्च 2019 रोजी सकाळी 11.00 वाजता जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने महिला उमेदवारांसाठी पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालयाचे  सहाय्यक संचालक अनिसा तडवी यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.
      या मेळाव्यात उपस्थित राहणाऱ्या उद्योजकांकडून विविध पदांसाठी उमेदवारांची निवड करावयाची असल्याने उमेदवारांनी मेळाव्यास स्वखर्चाने उपस्थित रहावे. मेळाव्यास येतांना शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे,बायोडाटा,पासपोर्ट फोटो,इत्यादिंसह दिनांक 13 मार्च 2019 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्दोजकता मार्गदर्शन केंद्रात  उपस्थित रहावे.
     उमेदवारांना नियुक्तांकडून देण्यात येणाऱ्या वेतनाबाबत व इतर सवलतीबाबत मेळाव्यास उपस्थित असलेले संबंधित कंपनीचे अधिकारी,प्रतिनिधी माहिती देणार आहेत, या सुवर्ण संधीचा इच्छुक उमेदवारांनी जास्तीत-जास्त संख्येने  उपस्थित राहून लाभ  घ्यावा असे आवाहन सहाय्यक संचालक, कौशल्य विकास यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment