Saturday, 1 December 2018

जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणीसाठी 15 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

             जळगाव, दि. 1 - सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरिता इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी भुसावळ येथील केंद्र सरकार संचालित जवाहर नवोदय विद्यालयासाठी प्रवेश चाचणी परीक्षा शनिवार, दि. ६ एप्रिल, २०१९ रोजी प्रत्येक तालुका केंद्रावर घेण्यात येणार आहे. त्या करिता चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवीत शिकत असणा-या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज १५ डिसेंबर, २०१८ पर्यंत करावयाचे आहेत.
             या चाचणी परीक्षेचे माहितीपत्रक व अर्ज अपलोड करण्याकरिता लागणा-या प्रमाणपत्राचा नमुना तसेच अर्ज भरण्यासाठी आवश्यक लिंक www.navodaya.gov.in, wwwjnvjalgaon.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अर्ज भरण्यापूर्वी सर्व संबंधितानी माहितीपत्रक काळजी पूर्वक वाचावे. इयत्ता पाचवीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी/मुख्याध्यापकांनी व अध्यापकांनी मुलांच्या हितासाठी जास्तीत जास्त संख्येने अर्ज भरावेत. अधिक माहितीसाठी व संपर्कासाठी मो. क्र. ८६९८१७५३४७ वर संपर्क साधावा. असे आवाहन नवोदय विद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. खंदारे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
                                                             000

No comments:

Post a Comment