पालकांनी आपल्या 9 महिने ते 15 वर्षापर्यंतच्या बालकांना गोवर रुबेलाची लस देण्याचे प्रशासनाचे आवाहन
जळगाव, दि . 21 - गोवर रुबेला लसीकरण मोहिमेतंर्गत जिल्ह्यातील कोणीही बालक वंचित राहणार नाही. यासाठी आरोग्य यंत्रणेने आवश्यक ते नियोजन करुन जिल्ह्याचे उद्दिष्ट विहित वेळेत पूर्ण करावे. अशा सूचना अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी आज दिल्यात.
गोवर रुबेला लसीकरण मोहिम, मिशन इंद्रधनुष्य व नियमित लसीकरण समन्वय समितीची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी श्री. गाडीलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबीता कमलापूरकर, उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. समाधान वाघ, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. प्रकाश यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना श्री. गाडीलकर पुढे म्हणाले की, गोवर हा अत्यंत संक्रमक आणि घातक आजार असल्याने तो विशेषत: मुलांना होतो. केंद्र व राज्य शासनाने गोवर रुबेला लसीकरण ही महत्वाकांक्षी मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेतंर्गत जिल्ह्यातील 9 महिने ते 15 वर्षापर्यंतच्या बालकांचे लसीकरण करावयाचे असल्याने आरोग्य यंत्रणेने आवश्यक ते नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी शालेय स्तरावर या मोहिमेची व्यापक अंमलबजावणी करावी. जेणेकरुन लसीकरणापासून कोणीही वंचित राहणार नाही. तसेच मिशन इंद्रधनुष्य व नियमित लसीकरणाचे कामही वेळेत पूर्ण करावे. याचबरोबर पालकांनीही आपल्या 9 महिने ते 15 वर्षापर्यंतच्या बालकांना गोवर रुबेलाचे लसीकरण करुन घ्यावे असे आवाहनही श्री. गाडीलकर यांनी केले.
गोवर रुबेला लसीकरण मोहिमेतंर्गत जिल्ह्यातील 12 लाख 11 हजार 206 बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. यापैकी आतापर्यंत 7 लाख 52 हजार 399 बालकांचे लसीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत 2838 मातांपैकी 2683 मातांची तपासणी करण्यात आली आहे. तर नियमित तपासणीचे कामकाज वेळेवर करण्यात येत असल्याची माहिती डॉ. कमलापूरकर यांनी बैठकीत दिली.
000

No comments:
Post a Comment