आधार
नोंदणीत जिल्हयाची सरासरी उत्कृष्ट
जळगाव, दि. १५:- आधार नोंदणीबाबत राज्याच्या सरासरी पेक्षा जळगांव जिल्हयाची सरासरी उत्कृष्ट असल्याचे
प्रतिपादन आधार नोंदणी प्रक्रीयेचे
उपमहानिर्देशक डॉ. संजय चहांदे यांनी
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत नुकतेचे केले.
आधार नोंदणी प्रक्रीयेचे
उपमहानिर्देशक डॉ. संजय चहांदे यांच्या अध्यक्षतेखाली आधार नोंदणी प्रक्रीया व नोंदणी केंद्र तसेच जिल्हयात आधार नोंदणी
झालेल्या प्रगतीची आढावा बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी श्री. चहांदे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
एस.के.दिवेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास आर.आर.तडवी माध्यमिक शिक्षणाधिकारी डी.पी.महाजन, प्राथमिक
शिक्षणाधिकारी बी.जी.पाटील, लीड बँक मॅनेजर, पोस्ट विभागाचे प्रतिनिधी बैठकीला
उपस्थित होते.
आधार नोंदणीचा उपयोग करुन स्वस्त
धान्य वितरण योजना व सामाजिक अर्थ सहाय्य योजना यांचे जिल्हयात उत्कृष्ट काम
झाल्याचेही डॉ. संजय चहांदे यांनी सांगितले. आधार नोंदणीबाबत
राज्याच्या सरासरी पेक्षा जिल्हयाची सरासरी उत्कृष्ट असल्याने उपमहानिर्देशक
डॉ.संजय चहांदे यांनी समाधान व्यक्त करुन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर व
जिल्हा प्रशासनाची प्रशंसा केली
जिल्हाधिकारी किशोर राजे
निंबाळकर यांनी जळगाव जिल्हयात ४४.४८ लाख आधार नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती देवून
त्यांनी सदर नोंदणीचे काम उत्कृष्ट असल्याचे सांगितले. यात उल्लेखनिय बाब म्हणजे ० ते ५ वयोगटातील नोंदणीची टक्केवारी ८३ टक्के आहे. प्राथमिक व माध्यमिक विभाग तसेच आदिवासी विभागातही
उल्लेखनिय नोंदणी पुर्ण झाली असून त्यांची टक्केवारी 95 टक्कयांपेक्षा जास्त
नोंदणी झालेली आहे. आधार नोंदणी केंद्र हे फक्त शासकीय कार्यालयातच कार्यान्वित
करण्याबाबत सुचना यावेळी संबंधितांना देण्यात आल्या. त्याकरीता महाऑनलाईनला 130
केंद्र कार्यान्वित करण्याच्या सुचना दिल्या. जिल्हयात विविध बॅंकांमध्ये ३३ आधार
नोंदणी केंद्र असुन त्यापैकी २१ कार्यान्वित आहे. मात्र त्यांचे नोंदणीचे प्रमाण
कमी आहे. महिला व बाल विकास विभाग व शिक्षण विभाग यांना नोंदणीसाठी १२० टॅब
देण्यात आले असून नागरीकांना आवाहन
करण्यात येते की, त्यांनी शासकीय कार्यालय, राष्ट्रीयकृत बॅकांच्या शाखा (आधार
नोंदणी असलेल्या) व पोस्ट कार्यालयात जावून आधार बाबतच्या सेवा घेण्यात याव्यात.
असेही जिल्हाधिका-यांनी यावेळी बैठकीत
सांगितले.
00
No comments:
Post a Comment