Friday, 7 December 2018

ग्रामविकास मंत्री ना. पंकजा गोपीनाथ मुंडे यांचा जिल्हा दौरा


        जळगाव, दि.7:- राज्याचे ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री ना. पंकजा गोपीनाथ मुंडे हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
             शनिवार दि. 8 डिसेंबर, 2018 रोजी सकाळी 11.30 वाजता महालक्ष्मी रेसकोर्स हेलिपॅड येथून हेलीकॉप्टरने भुसावळ जि.जळगावकडे प्रयाण. दुपारी 1.30 वा. बियाणी मिलीटरी स्कुल, भुसावळ जि.जळगाव हेलिपॅड येथे आगमन. दुपारी 1.35 वा. आ. संजय सावकारे यांच्या निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व राखीव. दुपारी 2.00 वा. बहिणाबाई महोत्सव कार्यक्रमाच्या उदघाटनास उपस्थिती. (स्थळ :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, भुसावळ), दुपारी 3.45 वा. बियाणी मिलीटरी स्कुल, भुसावळ, जि.जळगाव हेलीपॅड येथे आगमन व हेलीकॉप्टरने महालक्ष्मी रेसकोर्स मुंबईकडे प्रयाण.  
०००

No comments:

Post a Comment