Wednesday, 12 December 2018

पानी फाउंडेशन आयोजित वॉटरकप-4 मध्ये चार तालुक्यांची निवड, आज कार्यशाळा


जळगाव, दि. 12 (जिमाका वृत्तसेवा) :- पानी फाउंडेशन आयोजित वॉटरकप-4 सन 2019 स्पर्धेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात अमळनेर, पारोळा, चाळीसगाव, जामनेर असे एकूण 4 तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने छत्रपती संभाजीराजे सभागृह, मायादेवी नगर, महाबळ रोड, जळगाव येथे दि. 13 डिसेंबर, 2018 रोजी दुपारी 2.00 वाजता श्री. अविनाश पोळ, प्रमुख मार्गदर्शक, पानी फाउंडेशन यांच्या अध्यक्षतेखाली चारही तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांची स्पर्धेच्या नियोजनाबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सदर कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन सदस्य सचिव, ज.शि.अ. जिल्हास्तरीय समिती, तथा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
000000

No comments:

Post a Comment