जळगाव,दि.29
:- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जळगाव यांचे वतीने बाल विकास
क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय/स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल
झालेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात
एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी बालकल्याण क्षेत्रात
कार्यरत संस्थांमधील मुले व इतर मुले यांचेसाठी बालमहोत्सव दि. 29 डिसेंबर 2018 ते
31 डिसेंबर 2018 या कालावधीत जिल्हा क्रिडा संकुल, जळगाव येथे होत आहे.
त्यात
या मुलांसाठी विविध खेळ, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, सांस्कृतीक कार्यक्रम
इ. घेण्यात येणार आहेत.
या
महोत्सवाचा उदघाटन समारंभ दि. 29 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा क्रिडा संकुल, जळगाव येथे संपन्न झाला या कार्यक्रमासाठी अधिष्ठता,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावचे अध्यक्ष डॉ. भास्कर खैरे, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून बाल कल्याण
समिती सदस्य, डॉ. शैलजा चव्हाण, ॲङ प्रदिप
पाटील, श्री. नितीन विसपुते हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी क्रिडा
क्षेत्रातील तज्ञ शिक्षक श्री. प्रविण पाटील, श्री. इकबाल मिर्झा, श्री. आसिफ
मिर्झा, साजीद खान, जाहिद खान हे पंच म्हणून उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेस
माल्यार्पण करुन व दिपप्रज्वलन करुन बाल महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. या
प्रसंगी कार्यालयातील श्री. गजानन देशमुख, सहाय्यक लेखाधिकारी, श्रीमती. संध्या
वानखेडे, विधी सल्लागार, परिवीक्षा अधिकारी श्रीमती जयश्री पाटील, संरक्षण
अधिकारी, समुपदेशक, शाळेचे शिक्षक, महिला व बाल विकास क्षेत्रातील संस्थांचे
अधिक्षक, अधिकारी, कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
सदर बाल महोत्सवात विभागाच्या
संस्थांमधील बालके तसेच इतर शाळांमधील बालके असे एकूण 700 बालके सहभागी होते. सदर
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. रमेश काटकर यांनी
केले. तसेच अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव डॉ. भास्कर
खैरे व श्री. नितीन विसपुते यांनी कार्यक्रमप्रसंगी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे
सूत्र संचलन श्री. एस.आर. पाटील जिल्हा परिवीक्षा अधिकारी, जळगाव यांनी केले व
शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन परिवीक्षा अधिकारी श्रीमती सारिका मेतकर यांनी
केले. असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये
कळविले आहे.
000
No comments:
Post a Comment