जळगाव, दि. 4- ध्वजदिन निधी २०१७ मध्ये निधी संकलनाचे
कामी उत्कृष्ट कार्य केलेल्या शासकीय व निम शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना
पारितोषिक / प्रशस्तीपत्र वितरणाचा व ध्वजदिन निधी २०१८ संकलनाचा शुभारंभ
कार्यक्रम माजी सैनिक विश्राम गृह, मायादेवी मंदिर जवळ, महाबळ रोड, जळगाव येथे
दुपारी १२ वा. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये
दिली आहे.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, पोलीस अधिक्षक, दत्ता शिंदे, अपर
जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांची प्रमुख
उपस्थिती लाभणार आहे. यावेळी ध्वजदिन निधी संकलन -२०१८ चा शुभारंभ, शहीद/सैनिकांच्या
कुटूंबियांचा सत्कार व महाराष्ट्र शासनाकडून गौरव पुरस्कार वितरण करण्यात येणार
आहे. त्याचबरोबर ध्वजदिन निधी २०१७ मध्ये निधी संकलनाचे कामी उत्कृष्ट कार्य
केलेल्या शासकीय व निम शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना पारितोषिक/प्रशस्तीपत्राचे
वितरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर माजी सैनिकांच्या गुणवंत पाल्यांना
शिष्यवृत्तीचे वाटप मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास
सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातील ध्वजदिन निधी संकलन कामी काम केलेले
कर्मचारी, जिल्ह्यातील माजी सैनिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.
000
No comments:
Post a Comment