Wednesday, 12 December 2018

जिल्ह्यातील न्यासाचे विश्वस्तांनी 15 डिसेंबर रोजी ‘विश्वस्त दिवस’ साजरा करावा



जळगाव, दि. 12 (जिमाका वृत्तसेवा) :- सार्वजनिक संस्था, ट्रस्टचे विश्वस्त/पदाधिकारी यांना बदल अर्ज व ऑडीट रिपोर्ट दाखल करण्याबाबत माहिती व्हावी आणि त्यांना त्यांच्या दैनंदिन कामकाजात येणाऱ्या अडचणीविषयी मार्गदर्शन मिळावे याकरिता जिल्ह्यातील धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था यांना महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950 व या अधिनियमातील सुधारित तरतुदींची माहिती व्हावी म्हणून दि. 15 डिसेंबर, 2018 रोजी ठिक सकाळी 10 ते 2 या वेळेत ‘विश्वस्त दिवस’ साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्याकरिता जळगाव जिल्ह्यातील न्यासाचे विश्वस्तांनी दि. 15 डिसेंबर, 2018 रोजी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, गणेश कॉलनी रोड, जळगाव येथे उपस्थित राहावे असे आवाहन ग. श्री. जोशी, धर्मादाय उपआयुक्त जळगाव विभाग, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
00000

No comments:

Post a Comment