Friday, 14 December 2018

शाळा व महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती, अर्ज 25 डिसेंबर पर्यंत सादर करावेत -प्रकल्प अधिकारी- आर.बी.हिवाळे


जळगाव,दि.14:- जिह्यातील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापकांना यांनी शिष्यवृत्ती योजेनेंतर्गत लाभ देण्याकरीता महाराष्ट्र शासनामार्फत सन 2018-2019 या शैक्षणिक वर्षापासून httpd://mahadbtmahait.gov.in महाडीबीटी पार्टल विकसीत करण्यात आले आहे. दि.31 डिसेंबर, 2018 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत वाढ देण्यात आलेली आहे.
             31 डिसेंबर, 2018 पासून आदिवासी विकास विभागाचे या पुर्वीचे httpd://etribal.maharashtra.gov.in ई-विकास पोर्टल बंद करण्यात येणार असल्याने सन 2012-2013 ते 2017-2018 या कालावधीतील भारत सरकार पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती/शिक्षण शुल्क प्रतीपुर्ती योजनेंतर्गत आतापर्यंतचे प्रलंबित तसेच स्थगित असलेल्या सर्व अर्जावर 25 डिसेंबर 2018 पर्यंत कार्यवाही करून सदर अर्ज सेंड करून प्रकल्प कार्यालयास बी-स्टेटमेंट, बंधपत्र ‘अ’ व चेकलिस्टसह प्रस्ताव पडताळणीसाठी तात्काळ सादर करावेत.
            सन 2017-2018 पर्यंत प्रलंबित असलेले कोणतेही अर्ज महाडीबीटी पोर्टलद्वारे निकाली काढण्यात येणार नाहीत. विहित मुदतीत अर्ज निकाली न काढल्याने त्यामुळे भविष्यात काही प्रकरणे उदभवल्यास या प्रकरणी विलंब करणारे संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य, मुख्याध्यापक, कर्मचारी कारवाईस पात्र राहतील याची नोंद घ्यावी. असे आवाहन आर.बी.हिवाळे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल, जि.जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                    ०००

No comments:

Post a Comment