Tuesday, 4 December 2018

भुसावळ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तासिका तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात पद भरती


        जळगाव, दि. 4 - शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भुसावळ जि. जळगाव येथे विजतंत्री, तारतंत्री, जोडारी, आरेखक यांत्रिकी, कोपा व एम्लॉयबीलीटी स्क्रिल या व्यवसायातील रिक्त पदांकरिता तासिका तत्वावर अत्यंत तात्पुरत्या स्वरुपाची शिल्पनिदेशकांची पदे भरण्यात येणार आहे.
            याकरिता इच्छूक उमेदवारांनी दिनांक १२ डिसेंबर, २०१८ पर्यंत संस्थेच्या कार्यालयात शैक्षणिक अर्हतेच्या सत्यप्रतींसह अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक- ०२५८२-२४२३७८/८८३०४३१५७४ येथे संपर्क साधावा. असे  आवाहन प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भुसावळ यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000

No comments:

Post a Comment