Friday, 21 December 2018

वजनमापांबाबत तक्रार असल्यास ग्राहकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

       जळगाव, दि. 20 - वैधमापन शास्त्र अधिनियम 2009 व त्याअतंर्गत नियमानुसार आवश्यक असणाऱ्या कायदेशीर तरतुदीचे उल्लंघन आढळून आल्यास ग्राहकांनी वैधमापन शास्त्र कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन श्री. रा. भ. बांगर, सहायक नियंत्रक, वैधमापन शास्त्र कार्यालय, जळगाव यांनी केले आहे.
        पॅकबंद आवेष्टित वस्तुंवर वैधमापन शास्त्र अधिनियम 2009 व त्या अंतर्गत नियमानुसार आवश्यक तरतुदीप्रमाणे अधिकतम किरकोळ विक्री किंमत (सर्व करांसहीत) (MRP Rs -- lnclisive of all taxes) लिहिणे बंधनकारक आहे. मुळ किंमतीवर खाडाखोड करणे हा गुन्हा आहे. छापील किंमतीपेक्षा (More than MRP) जास्त किंमत आकारणे हा गुन्हा आहे. आवेष्टित वस्तुंवर उत्पादकाचे, पॅकरचे वा आयातदाराचे नाव व पुर्ण पत्ता छापणे बंधनकारक आहे. उत्पादनाचा/आवेष्टनाचा आयातीचा महिना व वर्ष लिहिणे आवश्यक आहे. ग्राहक तक्रार संपर्कासाठी संबंधित व्यक्तीचे नाव व पत्ता दुरध्वनी क्रमांक व ई मेल आवेष्टित वस्तुवर लिहिणे बंधनकारक आहे. ग्राहकांना वजनात/मापात कमी माल दिल्यास गुन्हा होतो. ग्राहकांकडुन कमी वजनात/मापात जास्त माल/वस्तु घेणे गुन्हा ठरतो. सोने, चांदीच्या व्यवहारात केवळ वर्ग-अ/वर्ग-ब चे दांडी तराजु किंवा वर्ग-1 किंवा वर्ग- 2 अचुकता असलेले अस्वयंचलीत उपकरणांचा (Non Automatic weinghing lnstrument) वापर करणे बंधनकारक आहे. साखर कारखान्यातील वाहन काटा (वे ब्रीज) अथवा व्यापा-याकडील तोलन उपकरणांबाबत शंका असल्यास त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या बंधनकारक असलेल्या वजनाव्दारे वाहन काटा (वे ब्रीज) अथवा तोलन उपकरण बरोबर असल्याची खातरजमा ग्राहकांना करता येईल. पेट्रोलपंपावर 5 लिटर क्षमतेचे प्रमाणित माप उपलब्ध असणे बधनकारक असल्याने वितरणाबाबत शंका असल्यास या मापाव्दारे ग्राहकांना खातरजमा करता येईल.
         याप्रमाणे कायदेशीर तरतुदीचे उल्लंघन आढळून आल्यास ग्राहकांनी नियंत्रण कक्ष मुख्यालय, मुंबई येथे 022/22622022, उप नियंत्रण कार्यालय, नाशिक येथे 0253-2455696 या दूरध्वनी क्रमाकांवर तसेच dyclmnashik@yahoo.in या ईमेलवर, तसेच सहाय्यक नियंत्रक, वैद्यमापन शास्त्र कार्यालय, मंडोरे मार्केट, आंबेडकर मार्केट जवळ, जिल्हापेठ, जळगाव येथे दुरध्वनी क्रमांक-0257-22411449 वर अथवा aclmjalgaon@yahoo.in या ईमेलवर संपर्क साधावा. असे आवाहन श्री. बांगर यांनी केले आहे.           
                                                                       ०००

No comments:

Post a Comment