Friday, 14 December 2018

जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती सभा संपन्न


              





         जळगाव:दि.14:- जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची मासिक सभा आज  जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांचे अध्यक्षतेखाली  त्यांच्या दालनात पार पडली.
       या बैठकीस महानगरपालिकेचे आयुक्त चंद्रकांत डांगे,आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आर.बी.हिवाळे,सहाय्यक आयुक्त समाज कल्याण  योगेश पाटील, जिल्हा सरकारी अभियोक्ता केतन ढाके प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा ,सहाय्यक संचालक कौशल्य विकास व उद्योजकता,जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी जिल्हा परिषदेचे माध्यमिक व  प्राथमिक शिक्षणाधिकारी, मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता,जिल्हा प्रशासन अधिकारी,नगरपालिका शाखा,जिल्हाधिकारी कार्यालय,जळगाव,पोलीस निरिक्षक आदी उपस्थित होते.
               जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी  सर्व संबंधित  विभागांच्या अधिकाऱ्यांकडून  मागील सभेचा विषयनिहाय  आढावा घेतला. यावेळी  जिल्हा व दक्षता व नियंत्रण समितीच्या सभेत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रतिबंधक अधिनियम तर  1989 अंतर्गत माहे नोव्हेंबर 2018मध्ये दाखल झालेले गुन्हे, पोलीस तपासावर असलेल्या गुन्हे,पोलीस  विभागाकडून , नोव्हेंबर अखेर न्यायालयात दाखल झालेले प्रकरणे    निकाली निघालेल्या प्रकरणांची सविस्तर आढावा सरकारी अभियोक्ता व पोलीस विभागाकडून  जिल्हाधिका-यांनी यावेळी घेतला.
 समाज कल्याण विभागाकडून  शासकीय वसतिगृह, निवासी शाळा व आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी, खानपान व्यवस्था, वसतिगृह इमारतींची स्थिती सोई सुविधां बाबतच्या  कार्यवाही तसेच अर्थसहाय्य व लाभार्थ्यांचा  आढावा घेवून प्रलंबित प्रकरणांवर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी  सर्वसबंधितांना यावेळी दिल्या.
०००००

No comments:

Post a Comment