Wednesday, 12 December 2018

लोकसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने 14 डिसेंबरपर्यंत माहिती सादर करावी


            जळगाव, दि. 12 (जिमाका वृत्तसेवा) :- लोकसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने जळगाव तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, महामंडळे तसेच केंद्र अथवा राज्य शासन अनुदानित कार्यालये, शाळा, महाविद्यालये यांना सुचित करण्यात येत आहे की, त्यांनी आपल्या अधिनस्त सर्व अधिकार व कर्मचारी यांची माहिती याआधी जमा केली नसल्यास स्वत:हुन तहसीलदार कार्यालय, बळीराम पेठ, जळगाव यांचेकडेस शुक्रवार दि. 14 डिसेंबर, 2018 पुर्वी विहित नमुन्यात जमा करावी.
            सदर संस्थामधील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने आपले नांव या यादीत असल्याची खात्री स्वत:हुन करुन घ्यावी. सदर माहिती देण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विहित मुदतीत माहिती न दिल्यास भारतीय लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 नुसार कार्यालय प्रमुख अथवा जबाबदार अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई प्रस्तावीत केली जाईल याची सर्वांनी कटाक्षाने नोंद घ्यावी. असे आवाहन तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, 13 जळगाव शहर विधानसभा मतदार संघ, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
000000

No comments:

Post a Comment