जळगाव, दि. 12 (जिमाका वृत्तसेवा) :- जिल्ह्याचे
नेव्ही दलातील सर्व पेन्शन धारक माजी सैनिक, युद्ध-विधवा, माजी सैनिक विधवा पत्नी तसेच
अवलंबित यांनी दिनांक 19 व 20 डिसेंबर, 2018 रोजी सकाळी 10.00 वाजता इंडियन नेव्हल
सेलर इन्स्टिट्युट-सागर, महर्षी कर्वे रोड, कुलाबा, मुंबई येथे पीसीडीए (नेव्ही), मुंबई
यांनी पेन्शन अदालतीचे आयोजन केले आहे. नेव्ही दलातील कोणत्याही प्रकारचे निवृत्ती
वेतन धारक माजी सैनिक, युद्ध विधवा, विधवा पत्नी, विरपत्नी, विरमाता, विरपिता यांनी
आपले पेन्शन संबंधी तक्रारी किंवा काही प्रश्न असल्यास आपले डिस्चार्ज बुक, पीपीओ,
बँकेतील पेन्शन पासबुक व ओळापत्र सोबत घेऊन वरील ठिकाणी 19 व 20 डिसेंबर रोजी सकाळी
10.00 वाजता हजर राहावे.
अधिक
माहितीसाठी www.pcdanavy.gov.in
या संकेत स्थळावर किंवा दूरध्वनी क्र. 022-22802764 तथा 22802765 किंवा ई-मेल pensionpcdanavy.dad@gov.in
वर संपर्क साधावा. असे आवाहन ले. कमांडर मिनल मधु पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,
जळगाव यांनी एक प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment